जय हनुमान तालीम मंडळाला 20 26 सालाचा‘गणराया अवॉर्ड’मध्ये तृतीय क्रमांक.
जय हनुमान तालीम मंडळाला 20 26 सालाचा‘गणराया अवॉर्ड’मध्ये तृतीय क्रमांक.
कोल्हापूर प्रतिनिधी : विजय बकरे
राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील जय हनुमान तालीम मंडळाने राधानगरी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित ‘गणराया अवॉर्ड २०२६’ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या हस्ते मंडळाला पारितोषिक प्रदान करण्यात आले .
यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणपती खोत, साताप्पा खोत, प्रशांत खोत, संतोष खोत, पी. आर. खोत, बबन खोत, सागर खोत आणि पोलीस पाटील रंगराव नलवडे उपस्थित होते.
गणेशोत्सवात शिस्त, नियोजन, पर्यावरणपूरक उपक्रम, ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव तसेच सामाजिक व जनजागृतीपर कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या सर्व सभासदांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने अहोरात्र केलेल्या कामाचे हे यश असल्याचे मत मंडळाचे ज्येष्ठ सभासद व माजी उपसरपंच साताप्पा खोत टायटन यांनी व्यक्त केले.
यापुढेही सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवत मंडळाच्या माध्यमातून असेच यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: