Header Ads

पाणी हेच जीवन: पाणी काटकसरीने वापरून नगरपालिकेला सहकार्य करा;

 पाणी हेच जीवन: पाणी काटकसरीने वापरून नगरपालिकेला सहकार्य करा;

---------------------------------------

पुसद तालुका प्रतिनिधी

सिद्धार्थ कदम

---------------------------------------

पुसद:   

"पाणी हेच जीवन असून त्याचा अमूल्य साठा जपून ठेवणे ही काळाची गरज आहे. पुसद नगरपालिकेमार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा योग्य व काटकसरीने वापर करून प्रत्येक नागरिकाने नगरपालिकेला सहकार्य करावे," असे आव्हानात्मक व कळकळीचे अपील सामाजिक  'जागो भीमसैनिक मंडळा'चे अध्यक्ष रंगनाथ धिरे यांचे पुसदवासीयांना आवाहन


संघटनेच्या 'जागो भीमसैनिक मंडळ', संभाजीनगर (पुसद) चे अध्यक्ष श्री. रंगनाथ धिरे यांनी पुसद शहरातील तमाम नागरिकांना केले आहे.

शहरात पाण्याचा अपव्यय टाळणे आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जागो भीमसैनिक मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

श्री. रंगनाथ धिरे यांनी नागरिकांना केलेले प्रमुख आवाहन:

 * पाण्याचा अपव्यय टाळा: पिण्याचे पाणी वाहने धुणे, अंगणात शिंपडणे किंवा इतर बिनकामाच्या गोष्टींसाठी वाया घालवू नका.

 * नळ बंद ठेवा: नळांना तोट्या बसवून पाण्याचा अनावश्यक प्रवाह थांबवा आणि पाणी भरल्यानंतर नळ उघडे सोडू नका.

 * नगरपालिकेला सहकार्य करा: नगरपालिकेच्या पाणीपुरवठा वेळापत्रकाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा.

 * जलसंधारण जपा: पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आजपासूनच काटकसर सुरु करा.

"पाणी ही सर्वांची सामायिक संपत्ती आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या प्रयत्नांना जेव्हा नागरिकांची साथ मिळेल, तेव्हाच आपण शहराला संभाव्य पाणीटंचाईपासून वाचवू शकू," असा विश्वास अध्यक्ष श्री. रंगनाथ धिरे यांनी या प्रसंगी व्यक्त केला. या आवाहनाला पुसद शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पाणी बचत करण्याचे आश्वासन दिले आहे.

No comments:

Powered by Blogger.