Header Ads

गुन्हेगारीला लगाम! रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सांगली जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई; विनायक पुजारी याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई.

 गुन्हेगारीला लगाम! रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सांगली जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार

सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई; विनायक पुजारी याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई.

सांगली | दि. २ ऑक्टोबर २०२६

सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार विनायक दत्तात्रय पुजारी (वय ३९, रा. रामनगर, समडोळी, ता. मिरज, जि. सांगली) याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. शरीराविरुद्ध तसेच अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल असलेल्या पुजारी याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांनी पारित केला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, विनायक पुजारी याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध तसेच अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनुषंगाने तो पुन्हा शरीराविरुद्धचे गुन्हे करण्यास प्रवृत्त होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) (अ) व (ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांच्याकडे सादर करण्यात आला.

या प्रस्तावावर सुनावणी होऊन उपविभागीय दंडाधिकारी विशाल यादव यांनी विनायक दत्तात्रय पुजारी याला सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्याची सांगली जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे.

हि

 कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

गुन्हे अन्वेषण पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अरुण औताडे, सपोफौ मेघराज रुपनर, पोहेकॉ बंडू पवार आणि अभिजीत पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments:

Powered by Blogger.