Header Ads

ओतूरमध्ये नशामुक्त अभियानांतर्गत जनजागृती रॅली; शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग

 ओतूरमध्ये नशामुक्त अभियानांतर्गत जनजागृती रॅली; शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग.



आळेफाटा (प्रतिनिधी )ओतूर(ता. जुन्नर )पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्री गाडगे महाराज विद्यालयात गुरुवारी (दि. 30) नशामुक्त अभियानांतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन व व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, शारीरिक व मानसिक आरोग्यावर तसेच सामाजिक व कौटुंबिक जीवनावर होणारे विपरीत परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले.

कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या नशामुक्त अभियान स्पर्धेबाबतही माहिती देण्यात आली. स्पर्धेत सहभाग, ऑनलाईन नोंदणीची पद्धत व बक्षिसांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिनेश साबळे, पल्लवी वटाणे, शुभांगी बारवकर, अंकाशा साबळे, अनिता पाडेकर, मयुरी खोसे  तसेच विद्यालयातिल ८०ते १०० विद्यार्थी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

No comments:

Powered by Blogger.