वरपे फार्महाऊसवर मध्यरात्रीचा ‘डान्स’ पोलिसांनी उधळला! मद्यधुंद अवस्थेत महिला आणि तीन पुरुष ताब्यात खुपिरे परिसरात करवीर पोलिसांची धडक कारवाई; अश्लील गाणी आणि हावभावांमुळे खळबळ.
वरपे फार्महाऊसवर मध्यरात्रीचा ‘डान्स’ पोलिसांनी उधळला! मद्यधुंद अवस्थेत महिला आणि तीन पुरुष ताब्यात
खुपिरे परिसरात करवीर पोलिसांची धडक कारवाई; अश्लील गाणी आणि हावभावांमुळे खळबळ.
कोल्हापूर | प्रतिनिधी : रहिम पिंजारी
कोल्हापूर : फार्महाऊसवर सुरू असलेल्या कथित अश्लील डान्स पार्टीवर करवीर पोलिसांनी धडक छापा टाकत एका महिलेसह तीन पुरुषांना ताब्यात घेतले. खुपिरे येथील वरपे फार्महाऊसवर १५ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. मद्यपान, मोठ्या आवाजातील गाणी आणि अश्लील हावभाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक!
करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना वरपे फार्महाऊसवर एका महिलेला बोलावून मद्यपान सुरू असल्याची आणि मोठ्या आवाजात गाणी लावून शांततेचा भंग केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी विशेष पथक तयार करून फार्महाऊसवर छापा टाकला.
पोलिसांनी तपासणी केली असता, बंद खोलीत तीन पुरुष आणि एक महिला मद्यधुंद अवस्थेत अश्लील गाण्यांवर हावभाव करत नृत्य करत असल्याचे आढळले. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले असून, संबंधितांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांची नावे समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या पुरुषांची नावे पवन पुंडलिक पवार (वय २६, रा. दोनवडे), सौरभ राजाराम कळके (वय २७, रा. दोनवडे) आणि श्रीधर बबन वरपे (रा. जयसिंगपूर) अशी आहेत. संबंधित फार्महाऊस श्रीधर वरपे यांच्या वडिलांचे असल्याची प्राथमिक माहिती आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस हवालदार रणजित पाटील, पोलीस अंमलदार प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण आणि महिला पोलीस अंमलदार प्रज्ञा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.




No comments: