Header Ads

शाहूपुरीत मध्यरात्री SBIच्या कॅश डिपॉझिट मशीनवर डल्ला! इलेक्ट्रॉनिक लॉक तोडून रोकड लुटण्याचा प्रयत्न.

 शाहूपुरीत मध्यरात्री SBIच्या कॅश डिपॉझिट मशीनवर डल्ला! इलेक्ट्रॉनिक लॉक तोडून रोकड लुटण्याचा प्रयत्न.


कोल्हापूर | फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

कोल्हापूर : शहरातील शाहूपुरी परिसरात मध्यरात्री स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या कॅश डिपॉझिट मशीनला लक्ष्य करून रोकड चोरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मशीन उचकटून आतील इलेक्ट्रॉनिक लॉक तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २.१८ वाजण्याच्या सुमारास न्यू शाहूपुरी येथील एस. एस. कम्युनिकेशनजवळ असलेल्या SBIच्या कोषागार शाखेअंतर्गत कॅश डिपॉझिट मशीनला लक्ष्य करण्यात आले. संबंधित मशीनचे आवरण उचकटून आतील इलेक्ट्रॉनिक लॉक तोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी संभाजी जगन्नाथ कुंभार (वय ४२, सध्या रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ६२ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस नोंदीत आरोपी म्हणून नुमान माणिक नायकवडी (वय २३, रा. बाचणी, ता. कागल, जि. कोल्हापूर) याचे नाव नमूद आहे.



मशीनमधील रोकड चोरीला गेली का?

पोलिसांच्या प्राथमिक नोंदीनुसार, या घटनेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे नमूद असून गुन्ह्यातील गेलेला माल आणि मिळालेला माल या दोन्ही रकान्यांत ‘निरंक’ अशी नोंद आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रोकड चोरीला गेल्याचे या नोंदीवरून स्पष्ट होत नाही.

शहरातील बँकिंग सुविधांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलिस करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.