Header Ads

विचारे माळात गांजाची तस्करी उघड; १ किलो १३२ ग्रॅम गांजासदृश पदार्थासह तरुण ताब्यात.

 विचारे माळात गांजाची तस्करी उघड; १ किलो १३२ ग्रॅम गांजासदृश पदार्थासह तरुण ताब्यात


कोल्हापूर | शाहूपुरी पोलीस ठाण्याची कारवाई

विचारे माळ येथील वनविभाग कार्यालयाच्या मागील बाजूस पीडब्ल्यूडी विभागाच्या रिकाम्या जागेत गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणास शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. सिद्दीक समीर नदाफ (वय २४, रा. शाहू कॉलेजसमोर, कोल्हापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.५० वाजता विचारे माळ परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयिताच्या पाठीवरील मोरपंखी व काळ्या रंगाच्या ‘Safri’ लिहिलेल्या सॅकमध्ये पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत १ किलो १३२ ग्रॅम वजनाचा हिरव्या रंगाचा, अर्धवट ओलसर, फुलांसह व दमट बियांसह गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला.

या मुद्देमालाची किंमत २५ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच संशयिताकडून ओपो कंपनीचा CPH 2865 मॉडेलचा मोबाईल फोन, किंमत ६० हजार रुपये, असा एकूण ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत मार्तंड आवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ७३७/२०२६ नोंद करण्यात आला आहे. गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील कलम ८(सी), २०(बी)(ii)(बी) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

संशयितावर यापूर्वीही गुन्हे दाखल

पोलिसांच्या नोंदीनुसार, सिद्दीक नदाफ याच्याविरुद्ध यापूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात २०२२, २०२३, २०२४ आणि २०२६ मध्ये विविध कलमांन्वये गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईत पोहेकॉ १२९७ अमित पवार आणि पोसई अभिजीत पवार यांचा सहभाग होता. प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत.

No comments:

Powered by Blogger.