अणुस्कुरा–चौकेवाडी मार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर पलटी; चौघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली!
अणुस्कुरा–चौकेवाडी मार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर पलटी; चौघे जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली!
शाहूवाडी प्रतिनिधी : आनंदा तेलवणकर.
शाहूवाडी : अणुस्कुरा–चौकेवाडी मुख्य मार्गावर प्रवासी टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच १४ एचयू ३८५८) चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात वाहनातील आठ प्रवाशांपैकी चार प्रवासी जखमी झाले.
अपघात होताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेल्या वाहनातून जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे काही काळ मार्गावर नागरिकांची गर्दी झाली होती. चालकाचा वाहनावरील ताबा नेमका कोणत्या कारणामुळे सुटला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

No comments: