Header Ads

मांडवा येथे बांधण्यात आला वनराई बंधारा.

*मांडवा येथे बांधण्यात आला वनराई बंधारा.

------------------------------

पुसद तालुका प्रतिनिधी 

सिद्धार्थ कदम

------------------------------

 पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मांडवा ग्रामपंचायत ही गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभियान, सेवा संकल्प अभियान अशा विविध अभियानच्या माध्यमातून लोकसहभाग व लोक चळवणीमधून मांडवा ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविले सध्या दुष्काळ सदृश्य स्थिती लक्षात घेता.शिवारातील ओढ्यावरील डहो येथे वनराई बंधारा टाकला.


 संततधार वाहणाऱ्या ओढ्यावरील डहो येथे बंधारा टाकल्यामुळे भुजल पातळी वाढण्यास मदत होईल,गुराढोरांना तसेच इतर प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत प्रशासक तथा विस्तार अधिकारी संतोष डाखोरे,ग्रामपंचायत सचिव एस. टी.तडसे, पोलीस पाटील दत्तराव पुलाते, माजी सरपंच अल्का ढोले, माजी उपसरपंच विजय राठोड, तंटामुक़्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सोसायटीचे उपाध्यक्ष वसंता आडे, कृषी सहाय्यक संगीता जाधव, रमेश ढोले, कैलास राठोड, विठ्ठल आडे, लखन दाढे,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदुम्न आबाळे तथा इत्यादी ग्रामस्थाचे या राबविलेल्या उपक्रमाबदल पशुपालकाकडून तसे शेतकरी बांधवाकडून कौतुक केल्या जात आहे.

No comments:

Powered by Blogger.