प्रगतशील शेतकरी बाबुराव गणपती पाटील यांचे निधन.
प्रगतशील शेतकरी बाबुराव गणपती पाटील यांचे निधन.
-------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाबुराव गणपती पाटील (वय ८४) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने कंथेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बाबुराव पाटील यांनी शेती क्षेत्रात प्रगतशील शेतकरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्राध्यापक बी. के. पाटील यांचे ते चुलते होत.
त्यांचे उत्तरकार्य रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी कंथेवाडी येथे होणार आहे.

No comments: