Header Ads

डॉ. रिता सायमन रॉड्रिक्स यांना राज्यस्तरीय ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२६ देण्यात आला ; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव!

 डॉ. रिता सायमन रॉड्रिक्स यांना राज्यस्तरीय ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२६ देण्यात आला ; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव!

इचलकरंजी : प्रतिनिधी(अर्जुन धोंडीराम धुमाळे)

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डी.के.ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी येथील डॉ. रिता सायमन रॉड्रिक्स यांची राज्यस्तरीय ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. साप्ताहिक लोकहिरा न्यूजच्या वर्धापनदिनानिमित्त या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

डॉ. रिता रॉड्रिक्स  यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याने इचलकरंजीच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांच्या या यशामुळे शिक्षक वर्ग, विद्यार्थी, सहकारी आणि हितचिंतकांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणजे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

डॉ. रिता सायमन रॉईक्स यांचे या मानाच्या पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन! तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Powered by Blogger.