मांडवा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संदर्भात बैठक संपन्न.
मांडवा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संदर्भात बैठक संपन्न.
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत येथे गुलाब नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय पुसदच्या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यासंदर्भात नियोजन बैठक दि. २८ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली होती.
या बैठकीसाठी गुलाब नबी आझाद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजेश काळे सर,प्रा.विवेक सिरस्कार,राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.राखी इंगळे ,सहाय्यक प्रा.संध्या कदम, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नरेश नालमवार हे मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या बैठकीत ग्रामस्वच्छता, पाण्याची भूजल पातळी वाढवण्यासाठी बंधारे टाकणे, शोषखड्डे तयार करणे, कृषी व महिला विषयक तज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम घेणे, विविध शिबिरे राबविणे, पाणीटंचाईमुळे हे शिबीर अनिवाशी ठेवण्यात येईल अशा विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी पोलीस पाटील दत्तराव पुलाते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सोसायटीचे उपाध्यक्ष वसंता आडे, ग्राम परिवर्तन समितीचे अध्यक्ष समाधान आबाळे ,रमेश ढोले, कैलास राठोड, गजानन आबाळे, अविनाश आबाळे, अक्षय डोळस, समिर धाड,सतिष चव्हाण, विक्रम राठोड, कृष्णा टेकाळे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी प्रदुम्न आबाळे, रोजगार सेवक बाळु धाड, तथा इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण धाड यांनी तर आभार पंकज आबाळे यांनी मानले.

No comments: