Header Ads

कारखाने सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य

 कारखाने सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य


(दत्तवाड प्रतिनिधी-: श्री.अर्जुन धोंडीराम धुमाळे)

गेल्या एक महिनाभरापासून ऊस दराची कोंडी फुटत नसल्याने ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर उदासीनता बरोबरच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम कधी सुरू होणार? याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर गुरुवारी ऊस दराची कोंडी फुटल्याने शुक्रवारपासून ऊसतोड सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला दिसून आला. या परिसरात ऊसतोड जोरात सुरू झाल्याने शेतकरी वर्गासह मजुरातून समाधान व्यक्त होत आहे.

उसाला पाच हजार पाचशे दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रयत संघटना यांच्या पुढाकाराने गेल्या दीड महिन्यापासून कर्नाटक-महाराष्ट्रमध्ये ऊस दरासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे दसऱ्यापासूनच ऊस दराच्या घोषणेस विलंब झाल्याने ऊसतोड मजुरांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे आपल्या पालावरच बसण्याची वेळ आली होती.

कामगारांना आर्थिक संकट तर जनावरांना वैरण नसल्याने मोठ्या प्रमाणात हाल होत होते. कधी एकदा दराची कोंडी फुटते आणि आपला कोयता सुरू होतो याचीच प्रतीक्षा त्यांना लागली होती. अखेर ही प्रतीक्षा गुरुवारी संपली आणि शुक्रवारी पहाटेपासूनच ऊसतोड मजुरांच्या शिवारातील गर्दीने परिसर गजबजून गेला आहे. यावेळी ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला होता.

यावेळी बोलताना ऊसतोड मजूर गणेश गरडे गोवराई, कर्टीचोळी (बीड), व नामदेव मोरे शिरपूर वैज (धुळे), म्हणाले, ऊसतोड नसल्यामुळे आम्ही पालावरच बसून होतो. हातात पैसा व काम नसल्याने आर्थिक संकट ओढवते की काय अशी भीती निर्माण झाली होती. उपासमारीचीही प्रसंग ओढवला होता.

त्यामुळे साखर कारखाने सुरू होण्याकडे आमचे लक्ष होते. अखेर दराची कोंडी फुटली आणि आमच्या आनंदावर पारावर उरला नाही. काम सुरू झाल्याने समाधान असल्याचे सांगितले.

No comments:

Powered by Blogger.