Header Ads

कळे येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श सत्यनारायण तालमीच्या महिला सदस्यांचा स्तुत्य उपक्रम - देवीची ओटी गरजूंना दान

 कळे येथे सामाजिक बांधिलकीचा आदर्श सत्यनारायण तालमीच्या महिला सदस्यांचा स्तुत्य उपक्रम - देवीची ओटी गरजूंना दान.

कळे प्रतिनिधी

साईश मोळे

९५९५३१६२६६


नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळे येथील श्री सत्यनारायण तालीम मंडळाच्या महिला सदस्यांनी सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.

दरवर्षी देवीला अर्पण करण्यात येणारी ओटीचे साहित्य - साडी, नारळ, फळे, धान्य याचा योग्य वापर व्हावा आणि खऱ्या अर्थाने देवीची सेवा घडावी, या उदात्त हेतूने महिला सदस्यांनी एकत्र येऊन देवीला अर्पण केलेले ओटीचे सर्व साहित्य गावातील गरीब आणि गरजू महिलांना दान करण्याचा निर्णय घेतला.

या उपक्रमात तालमीच्या महिला सदस्यांनी गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन गरजू कुटुंबांना हे साहित्य वाटप केले. केवळ धार्मिक परंपरा न जपता त्याला सामाजिक कार्याची जोड देण्याच्या त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

"देवीची खरी ओटी ही गरजूंची सेवा करण्यातच आहे," अशी भावना यावेळी महिला सदस्यांनी व्यक्त केली.

या सामाजिक उपक्रमामुळे सत्यनारायण तालीम मंडळाचे आणि विशेषतः महिला वर्गाचे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.

No comments:

Powered by Blogger.