Header Ads

रेंदाळच्या लेकीची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी; ‘बेस्ट रेडर’ पुरस्काराने सन्मानित!

रेंदाळच्या लेकीची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी; ‘बेस्ट रेडर’ पुरस्काराने सन्मानित!

सचिन कुंभार 

रेंदाळ प्रतिनिधी 

9021281100


     रेंदाळ ता. हातकणंगले  क्रीडा क्षेत्रात रेंदाळ गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रेंदाळची होतकरू कबड्डीपटू कीर्ती पुजारी हिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर महाराष्ट्र संघात स्थान मिळवले आहे. हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याने रेंदाळसह संपूर्ण परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कीर्तीने आपल्या उत्कृष्ट चढाया, चपळाई आणि आक्रमक खेळाच्या जोरावर विशेष छाप पाडली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिला प्रतिष्ठेचा ‘बेस्ट रेडर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवशक्ती क्रीडा मंडळानेही आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर विजयी हॅट्ट्रिक साधली आहे. मंडळाच्या या यशामुळे रेंदाळच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणाऱ्या कीर्तीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे गावातील नवोदित खेळाडूंनाही निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकविण्यासाठी सज्ज झालेल्या कीर्ती पुजारी हिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

रेंदाळच्या लेकीचा हा अभिमानास्पद प्रवास असाच यशाच्या शिखराकडे जावो, हीच सदिच्छा!

No comments:

Powered by Blogger.