सांगलीत भाजपच्या वतीने ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न!
सांगलीत भाजपच्या वतीने ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न!
शिरोळ तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग.
शिरोळ तालुका प्रतिनिधी अर्जुन धुमाळे महाराष्ट्र फ्रंट लाईन न्यूज
सांगली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगली येथे ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ या घोषवाक्याखाली भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेमध्ये शिरोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या पदयात्रेमध्ये कोल्हापूर जिल्हा भाजप सरचिटणीस मा. श्री. सतीश पंडित, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. प्रशांत शहापुरे, कोल्हापूर जिल्हा भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष मा. श्री. राजगोंडा पाटील, कुरुंदवाड मंडल प्रमुख मा. श्री. रमेश चव्हाण, शिरोळ मंडल प्रमुख मा. श्री. महेश देवताळे, हेरवाडचे माजी सरपंच मा. श्री. सुरगोंडा पाटील, मा. श्री. चंदुरे आण्णा, आलासचे युवा नेते मा. श्री. राजू म्हैशाळे, अभिजित प्रभावळकर, पिरगोंडा पाटील, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष तेजस वराळे, कलगोंडा पाटील यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग नोंदवत ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ हा संदेश दिला. सांगली येथे आयोजित या पदयात्रेमुळे शिरोळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
शिरोळ तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग या पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

No comments: