युवापिढीने ज्येष्ठांचा आदर आणि सन्मान ठेवल्याने पुण्य मिळेल : सखी साई रमेश प्रकाशजी महाराज

युवापिढीने ज्येष्ठांचा आदर आणि सन्मान ठेवल्याने पुण्य मिळेल : सखी साई रमेश प्रकाशजी महाराज

---------------------------------------------------------------------------------------------


--------------------------------------------------------------------------------------------

गांधीनगर:- आपल्या कुटुंबातील युवा पिढीने ज्येष्ठांचा आदर राखून सन्मान ठेवा. त्यांची सेवा केल्याने  चांगले फळ आणि पुण्य तुम्हाला निश्चित मिळेल असे प्रतिपादन सखी साई रमेश प्रकाशजी महाराज (कटनी, मध्य प्रदेश) यांनी केले. ते गांधीनगर येथील सिंधी सेंट्रल पंचायत मध्ये आयोजित केलेल्या स्वामी शांति प्रकाश चालीसा महोत्सव समारंभ आणि गांधीनगर, कोल्हापूर येथील सिंधी समाजातील प्रतिष्ठित जेष्ठांच्या सन्मानाप्रसंगी  बोलत होते.

साई रमेश प्रकाशजी महाराज म्हणाले   कुटुंबातील जेष्ठांनी हाल, अपेष्टा, आणि कष्ट करून आपल्या पिढीचा सांभाळ केला आहे. त्यामुळे युवा पिढीने त्यांचा अनादर न करता त्यांचा आदर राखून त्यांची सेवा केल्याने पुण्य मिळेल.

या कार्यक्रमादरम्यान कोल्हापुर आणि गांधीनगरातील प्रतिष्ठित सत्तर जेष्ठ नागरिकांचा आणि गांधीनगरचे सपोनी सत्यराज घुले यांचा सन्मान रमेश प्रकाशजी महाराज यांच्या हस्ते  करण्यात आला. या सन्मानामुळे ज्येष्ठ नागरिक भाऊक झाले होते. गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक टेहलानी,व विष्णू टेहलानी परिवार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वामी देव प्रकाश महाराजजी यांच्या आशीर्वादाने व साई रमेश प्रकाश महाराज यांच्या प्रेरणेतून देश विदेशात अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यातून ज्येष्ठांच्या सन्मानाची प्रेरणा मिळते. या कार्यक्रमास स्वामी देवप्रकाश महाराज युवा मंचचे सर्व सदस्य, भक्तगण, सिंधी महिला, बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गांधीनगर स्वामी शांति प्रकाश चालीसा महोत्सव समारंभ आणि ज्येष्ठांचा सन्मान सखी साई रमेश प्रकाश जी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अशोक टेहलनी, विष्णू टेहलानी, रमेश तनवाणी, सुरेश टेहलानी, व सिंधी बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.