Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ए. एस. ट्रेडर्स व ट्रेडविंग सोल्युशन्सचे जिल्ह्यातील कार्यालये सुरू!

 ए. एस. ट्रेडर्स व ट्रेडविंग सोल्युशन्सचे जिल्ह्यातील कार्यालये सुरू!

--------------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर प्रतिनिधी

अन्सार मुल्ला

--------------------------------------------------------

काल कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये हजारोच्या संख्येने जमत ए. एस. ट्रेडिंगच्या गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिले होते.

 या निवेदनानुसार ए. एस. ट्रेडिंग या कंपनीतील हजारो ठेवीदारांना एका तक्रारीनंतर चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी ठेवीदारांच्या शिष्टमंडळाला अतिशय विश्वासपूर्ण आश्वासक प्रतिसाद दिल्याने, ठेवीदारांच्या आणि कंपनीच्या व्यवस्थापनातील लोकांमध्ये आशादाय चित्र निर्माण झाले आहे. आज पासून ए. एस. ट्रेडर्स आणि ट्रेडविंग सोल्युशन्स या कंपनीचे शहरातील तसेच जिल्ह्यातील इतरत्र शेकडो कार्यालय सुरू करण्यात आले. तसेच कंपनीचे दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी ठेवीदारांना त्यांच्या कार्यालयाची संरक्षणाची संपूर्ण हमी दिल्याने कंपनी तसेच ठेवीदारांच्या मध्ये आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. नजीकच्या काळात कंपनीचे शाहूपुरी येथील गेल्या आठ वर्ष भाडेतत्त्वावर असणारे कार्यालय नक्की सुरू होईल असे खात्रीलायक रित्या समोर येत आहे. मुळात ए. एस. ट्रेडिंग ही कंपनी आर्थिक बाबीवर काम करते त्यामुळे कंपनीच्या बाबतीत काही न्यायालयीन बाब निर्माण झाल्यानंतर आर्थिक व्यवहार ठप्प करून चालत नाहीत. असे झाले तर 'रोगापेक्षा इलाज भयंकर' अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि खुद्द जिल्हा पोलीस प्रमुख यांनी कंपनीच्या ठेवीदारांना कायदेशीर मदत करण्याची भूमिका घेतल्याने या प्रकरणात लवकरच ठेवीदारांच्या बाजूने आशादायक चित्र दिसून येईल असे म्हणावे लागेल.

Post a Comment

0 Comments