दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाला "कलाविष्कार".
दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाला "कलाविष्कार".
----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली ता.करवीर येथे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी या शाळेत कलाविष्कार हा कार्यक्रम घेतला जातो या ही वर्षी अगदी उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला .
जवळ जवळ सहा दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, गीत गायन , कथाकथन , रांगोळी स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, खाद्य महोत्सव असे कार्यक्रम घेण्यात आले .शाळेच्या हॉल मध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे, नक्षीकाम, विविध आकर्षक वस्तू यांचे कलादालन भरवले होते. यामध्ये कलाशिक्षक अमोल फराकटे सर यांनी शाहू महाराज यांनी बांधलेल्या राधानगरी धरणाची हुबेहूब प्रतिकृती या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते.अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला.या करीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.बाळासाहेब राऊत सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीरा राऊत मॅडम, कलाशिक्षक अमोल फराकटे सर, वागरे सर, व इतर सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment