कुपवाड मध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कुपवाड मधील एकावर गुन्हा दाखल.
कुपवाड मध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कुपवाड मधील एकावर गुन्हा दाखल.
----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
कुपवाड शहरातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयताविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (अनिल गोविंद गडदे वय. 42 राहणार. बामणोली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही घरात एकटीच असल्याचे पाहून संशयित अनिल गडदे याने तिचा विनयभंग केला असल्याची तक्रार पीडित महिलेने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीसांनी अनिल गडदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment