जयसिंगपूर : खाजगी सावकारीच्या जाळ्यात अडकलेला व्यापारी – ईडी व पोलिसांकडे तक्रार.
जयसिंगपूर : खाजगी सावकारीच्या जाळ्यात अडकलेला व्यापारी – ईडी व पोलिसांकडे तक्रार.
--------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
--------------------------
राज्यभर सावकारी विरोधी कायदा लागू असतानाही बेकायदेशीर खाजगी सावकारी करणाऱ्या टोळ्यांचा त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारात जयसिंगपूर शहरातील राजेंद्र शहापुरे यांच्यावर पीएमपीएमएल कायद्याअंतर्गत व खाजगी सावकारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संघटना आपला हक्क महाराष्ट्र राज्य तर्फे करण्यात आली आहे.
संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल पोवार यांनी दिनांक 12 मार्च रोजी ईडी संचालक, मुंबई तसेच जयसिंगपूर पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
निवेदनानुसार, देशभरात मणी लॉण्ड्रिंगचे प्रकरणे उघडकीस येत असताना जयसिंगपूर परिसरातदेखील मोठ्या प्रमाणावर खाजगी सावकारी सुरू आहे. या सावकारीतून बेकायदेशीररीत्या प्रचंड पैसा फिरवला जात असून, त्याचा गुन्हेगारी कारवायांशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राजेंद्र शहापुरे हे बेकायदेशीर सावकारी कारवायांमध्ये गुंतलेले असून, त्यांनी 10 ते 15 टक्के व्याजदराने पैसे देऊन स्थानिक व्यापाऱ्यांना आर्थिक जाळ्यात अडकवले आहे. या व्याजदरामुळे अनेक व्यापारी व सामान्य नागरिक कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत.शहापुरे यांनी वेगवेगळ्या नावाने सावकारी करत लाखो रुपयांचा निधी फिरवला आहे.
अनेक लोकांकडून ९ लाखांहून अधिक रक्कम दरमहा २४ महिन्यांसाठी फेड करण्याचा करार करून जवळपास २ कोटींपेक्षा जास्त रक्कम वसूल केली असल्याचे नमूद केले आहे.
सावकारीतून वसुली करताना धमक्या, जीव मारण्याच्या धमक्या, तसेच मारहाणीचे प्रकार घडत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.तक्रारकर्त्यांनी पोलिस व ईडी या दोन्ही यंत्रणांना पत्र पाठवून या प्रकरणाची तपासणी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
तसेच, अशा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांमुळे राजकीय व्यवस्थेचा गैरवापर होत असून, काळा पैसा निर्माण होत असल्याचा गंभीर इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
सावकारीबाबतचा पुरेसा पुरावा असूनदेखील कारवाई होत नसल्यामुळे संघटना व नागरिकांमध्ये नाराजी आहे. "तुरळक व्यक्तींना वाचवण्यासाठी कारवाई टाळली जात आहे का?" असा सवालही निवेदनात करण्यात आला आहे.
याबाबत तातडीने तपास सुरू करून राजेंद्र शहापुरे यांच्यावर खाजगी सावकारी गुन्हा व मनी लॉण्ड्रिंग प्रकरण नोंदवावे, अन्यथा पुढील मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा आपला हक्क संघटनेने दिला आहे जयसिंगपूर पोलिस ठाणे मध्ये महादेव कंटीकर यांनी दोन-तीन महिन्यापूर्वी जयसिंगपूर पोलीस ठाण्या मध्ये सतरा ते अठरा जणांविरुद्ध सावकारकीचा अर्ज दिला आहे त्यामध्ये राजेंद्र शहापुरे यांचे नाव आहे तरीही गुन्हा दाखल केला नाही म्हणून शहरात खाजगी सावकारीमुळे व्यापारी व नागरिकांचे हाल होत असून, स्थानिक व्यापाऱ्यावरच २ कोटींच्या वर वसुलीचे आरोप झाले आहेत. ईडी व पोलिस यंत्रणांनी याबाबत तातडीने कारवाई करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
Comments
Post a Comment