Header Ads

सह्यगिरीची पूरग्रस्तांसाठी एक पणती माणूसकीची* मच्छीमारी करणाऱ्या भोई बांधवांसोबत केली दिवाळी साजरी

 *सह्यगिरीची पूरग्रस्तांसाठी एक पणती माणूसकीची*

मच्छीमारी करणाऱ्या भोई बांधवांसोबत केली दिवाळी साजरी 

-------------------------------

सलीम शेख 

-----------------------------


कोल्हापूर : गनबावडा तालुक्यातील सह्यगिरी संस्थेने करमाळा तालुक्यातील  पुरग्रस्त भोई बांधवांच्या प्रति सामाजिक जीणीव जपत एक पणती माणुसकीची  हा उपक्रम हाती घेतला . आणि भोई वस्तीवर अशेचे आकाश कंदील लावत... एकीचे तोरण बांधून ..माणुसकीची  पणती तेवत ठेवून. पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली .या सामाजिक  उपक्रमाने पूरग्रस्तांचे चेहरे आनंदाने फुलले .

    सह्यगिरी परिवार दरवर्षी वंचित दुर्बल घटकांसाठी एक पणती माणुसकीची उपक्रम राबवत असतात .यावर्षी या उपक्रमाचे सातवे वर्ष . सोल्हापूर जिल्हातील करमाळा तालुक्यातील सीना नदीमध्ये मच्छीमारी करणारे  भोई बांधव बोरगावात  राहतात .सप्टेंबर महिन्यामध्ये आलेल्या महापुरात भोई बांधवांची वस्ती पूर्ण पाण्याखाली गेली होती . शेतीबाडी ,संसार साहित्य, विद्यार्थ्यांची दप्तर पाण्यात वाहून गेली.

        भोई वस्तीमध्ये  सह्यगिरी परिवाराने दारोदारी रांगोळी काढून, दारी तोरणे बांधून ,आकाश कंदील लावले . भोई बांधवांना एकत्र करून महिलांना साडी -चोळी , पुरुषांना गमजा -टोपी अशी नवी कपडे देण्यात आली .शालेय विद्यार्थ्यांना दप्तर पाटी व शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले सर्व कुटुंबांना दिवाळीचा फराळ, साबण, उठणे सुगंधी तेल देऊन दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेतले .

         सह्यगिरीचे  समन्वयक सुधीर शिंदे यांनी संगीत दिवाळी साजरी करून पूरग्रस्तांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण केले .

       सह्यगिरीचे सोलापूर सन्वयक बलभीम बनसोडे यांनी उपक्रमाचा हेतू विशद केला . कार्यक्रमास बोरगाव कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन नवनाथ मस्के,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक भोज, केंद्रप्रमुख निशांत खारगे,राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेचे संचालक अशोक दुधे ,जुनी पेन्शन संघटनेचे करमाळा तालुका सचिव प्रताप राऊत, जि.प . प्राथ.शाळा करंजे चे विषय शिक्षक शिवलाल शिंदे, बोरगाव शाळेचे उपशिक्षक श्रीराम बुलबुले उपस्थित होते .

   गगनबावडा तालुक्यातील सह्यगिरी संस्थेने सोलापूर जिल्ह्यातील बांधवांसाठी साजरी केलेल्या अनोख्या दिवाळीचे सर्वत्र कौतुक होत आहे .

No comments:

Powered by Blogger.