Header Ads

वेश्या व्यवसाय चालवणारी एक महिला व तीन पुरुष अटक – दोन पीडित महिलांची सुटका.

 वेश्या व्यवसाय चालवणारी एक महिला व तीन पुरुष अटक – दोन पीडित महिलांची सुटका.

------------------

संस्कार कुंभार .

------------------

कोल्हापूर :- कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या कारवाईत उचगाव येथील साईश अपार्टमेंटमध्ये चालणारा बेकायदेशीर वेश्या व्यवसाय उघडकीस आला.

कारवाईत सुजाता सचिन साळुंखे (वय 34) हिला तसेच तिचे तीन साथीदार सुमित देशमाने, लखन कांबळे व तौसिफ सुतार यांना अटक करण्यात आली.

या ठिकाणावरून मुंबई व इचलकरंजी येथील दोन महिलांची सुटका करण्यात आली असून ₹8,56,530/- किंमतीचा मुद्देमाल (रोख, मोबाईल, स्विफ्ट डिझायर कार, अप्पे रिक्षा इ.) जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता व मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पो.नि. शितलकुमार कोल्हाळ व त्यांच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.