Header Ads

भुदरगड मध्ये हालचाली गतिमान,कॉग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक

 भुदरगड मध्ये हालचाली गतिमान,कॉग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक 

----------------------------
भुदरगड स्वरूपा खतकर

--------------------------------


भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भुदरगडमधील सर्व नेत्यांची बैठक झाली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश आणि सद्या काँग्रेसची तालुक्यात असलेली भक्कम फळी विचारात घेत बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागा पक्षाच्या चिन्हावर लढविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. जर कोणाला काँग्रेससोबत यायचे असेल तर याबाबतचा अंतिम निर्णय आमदार सतेज पाटील यांनी घ्यावा असे कार्यकर्त्यांनी एकमताने सांगितले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यापासून सर्वत्र राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. इच्छुकांनी आपल्या उमेदवारीसाठी जोरदार फील्डिंग लावली आहे. नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीनी वेग घेतला आहे. भुदरगड तालुक्यात या निवडणुकीत राजकीय चित्र कसे असेल याबाबत सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे. राजकीय नेते राज्य व जिल्हा पातळीवरील घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत. तर इच्छुक आपल्याच उमेदवारीची फील्डिंग कशी लागेल याबाबत प्रयत्नशील आहेत.


दरम्यान, भुदरगड तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेते, कार्यकर्ते यांची जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत निवडणूकीच्या पार्शवभूमीवर सविस्तर राजकीय आढावा घेण्यात आला. आमदार पाटील यांनी सर्व नेत्यांशी याबाबत एकत्रित चर्चा केली. यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच लढविण्याबाबत निर्णय घेतला आहे.

यावेळी बिद्रीचे संचालक राहुल देसाई, सत्यजित जाधव, जीवन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई,  समन्वयक सचिन घोरपडे, संदीप पाटील, धोंडीराम मगदूम, सरपंच प्रकाश वास्कर, नारायण पाटील, संजय सरदेसाई, बाळासाहेब गुरव, एम. डी. पाटील, संदीप देसाई आदी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.