कोथळी गावात कृष्णा नदीकाठी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.
कोथळी (ता. शिरोळ) -
आज दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी सुमारास कोथळी गावच्या हद्दीत कृष्णा नदीपात्राच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मयत व्यक्तीचे नाव बसवेश्वर गुरुसिद्धाप्पा गुगवाडे (वय 62, रा. पेठभाग, मेन रोड, सांगली, ता. मिरज, जि. सांगली) असे असून ते वर्दिदार सोमनाथ मल्लप्पा गुगवाडे यांचे चुलते आहेत. ही घटना गट क्रमांक 355, कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या ठिकाणी घडली.मिळालेल्या माहितीनुसार दुपारी साधारण 2.15 वाजण्याच्या सुमारास संबंधित इसमाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आला. तत्काळ याची माहिती वर्दिदारांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.या प्रकरणाची नोंद सहाय्यक फौजदार गुरखे यांनी केली असून तपास पो. उपनिरीक्षक ईनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृतदेह पुढील तपासासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
No comments: