सातारा जिल्ह्याच्या वर्ये गावामध्ये वेंना नदीच्या पात्रात कचऱ्याचे साम्राज्य लोकांचे आरोग्य धोक्यात.-
सातारा जिल्ह्याच्या वर्ये गावामध्ये वेंना नदीच्या पात्रात कचऱ्याचे साम्राज्य लोकांचे आरोग्य धोक्यात.
---------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी -
अमर इंदलकर
-----------------------------------------
सातारा जिल्ह्यातील वेंना नदी पात्रात तसेच तेथील पुलावर प्लास्टिक पिशव्याच्या कचऱ्याचे लोट दिसून येत असून स्थानिक प्रशासनाचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे. अशा बेजबाबदारपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून रोगराईस जणू आमंत्रण दिले जात असल्याचे विदारक चित्र हे पाहायला मिळत आहे.वेंना नदीपात्रात जलप्रदूषण देखील ह्या प्लास्टिक कचऱ्याने होत आहे. वेंना नदी पुलावर त्याच कचऱ्याच्या ढीगाऱ्यावर गायी,म्हशी,भटके कुत्रे, यांचा वावर पाहायला मिळत आहे. साताऱ्यात पदार्पण करतेवेळी हा कचराच जणू साताऱ्यात पर्यटकांचे स्वागत करीत असल्याचे व्यंग चित्र भासत आहे. वेंना नदीपुलावर वर्ये गावानजिक अनेक छोटी दुकाने हॉटेल हातगाड्या मेडिकल असून वेंना नदीपुलावर कचरा होण्याचे कारण नेमके काय असणार आहे! असे स्थानिक नागरिक उदाहरण देऊन सांगत आहेत. स्थानिक प्रशासनाने दांडात्मक उपाययोजना बाजावून परिसर स्वच्छ सुंदर आरोग्यदायी करावा अशी स्थानिकांची मागणी आहे. तसेच वेंना नदीपात्र रोगराई मुक्त व्हावे ही सर्व नागरिकांची अपेक्ष दिसून येत आहे.

No comments: