Header Ads

युवा नेते प्रतिक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

 युवा नेते प्रतिक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप .

----------------------------
प्रतिनिधी सचिनराव मोहिते.
-------------------------------

   अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष युवा नेते प्रतिक राजेंद्र साळुंखे यांचा ३१ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे तसेच मराठा महासंघ दिनदर्शिकांचे वाटप करण्यात आले.

     कार्यकर्त्यांनी वाढदिवस मोठ्याने करण्याचे नियोजन आखले होते परंतु जिल्हाअध्यक्ष प्रतिक साळुंखे यांनी वाढदिवसाचा खर्च नाहक पणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात याव्यात असे मत व्यक्त केले. व्यक्त केलेले मत डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले. यावेळी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सात्विक मोहिते, विराज पाटील, सुजल कुकडे, हर्षवर्धन यादव, अथर्व माळी, वेदांत चिले, अक्षय नाईक, नंदन मगदूम, आकाश पांढरे, आर्यमन सुतार, मैत्रयी सरदेसाई, पृथ्वीराज जाधव, सचिन जाधव, सिद्धेश दळवी, हर्षद जाधव, दीपराज कोळी, सचिन चौगुले, आशिष साने,ओंकार गालवे आदी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.