Header Ads

अपक्ष उमेदवार जयश्रीताई शेवते यांचे कुडाळ जिल्हा परिषद गटात पारडे जड “सामान्य माणसांची ताकद एकत्र दाखवूया” – जयश्रीताई शेवते

 अपक्ष उमेदवार जयश्रीताई शेवते यांचे कुडाळ जिल्हा परिषद गटात पारडे जड

“सामान्य माणसांची ताकद एकत्र दाखवूया” – जयश्रीताई शेवते.

---------------------------

प्रतिनिधी/ शेखर जाधव .

---------------------------

सातारा/ जावली  :कुडाळ जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार सौ. जयश्री (ताई) शेवते यांच्या प्रचाराला वेग आला असून, त्यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या संपूर्ण गटात पाहायला मिळत आहे. गावभेटी, कोपरा सभा, थेट जनसंवादाच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत पोहोचत असून, महिला वर्गासह ओबीसी समाजाचा त्यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे.

सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या जयश्री शेवते यांनी नुकतीच कुडाळ येथील इंदिरानगर परिसरात भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येथील रहिवाशांच्या अडचणी ऐकून घेत “आपण नेहमी जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहू” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकीय समीकरणांपेक्षा विकासाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

इंदिरानगर येथील ग्रामस्थांनीही विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारालाच पाठिंबा देण्याचा ठाम निर्णय घेत जयश्री (ताई) शेवते यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे येत्या निवडणुकीत कुडाळ जिल्हा परिषद गटात निश्चितच बदल पाहायला मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना जयश्री शेवते म्हणाल्या की, “आतापर्यंत कुडाळ जिल्हा परिषद गटात विकासापेक्षा राजकारणालाच अधिक महत्त्व दिले गेले. मूळ ओबीसी समाजाला उमेदवारीचा नैसर्गिक हक्क असतानाही, इतर समाजातील प्रतिनिधींनी राजकीय आरक्षणाचा गैरफायदा घेतला आहे. हा अन्याय आता थांबवण्याची वेळ आली असून, कोणत्याही परिस्थितीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना याचा लाभ घेऊ देणार नाही.”

त्या पुढे म्हणाल्या की, “या गटात निश्चितच कायापालट होणार आहे. आर्थिक बळाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सामान्य माणसांची खरी ताकद काय असते, हे आपण एकत्र येऊन दाखवून देऊया.”

यावेळी दीपक शेवते यांनीही मतदारांशी संवाद साधताना सांगितले की, “आपण संविधानावर विश्वास ठेवणारे नागरिक आहोत. खुर्चीच्या हव्यासापोटी जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. कुडाळ जिल्हा परिषद गटातील जनता सुज्ञ असून, कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता जयश्री शेवते यांना साथ देईल.”

त्यांनी मतदारांना जयश्री शेवते यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

No comments:

Powered by Blogger.