एमआयडीसी कुपवाड येथे 19 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक; नागपूरहून माल गायब.
एमआयडीसी कुपवाड येथे 19 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक; नागपूरहून माल गायब.
--------------------------------
सांगली प्रतिनिधी
--------------------------------
एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात 19,09,122 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष शिवगोंडा पाटील (वय 38, रा. इनाम धामणी, ता. मिरज, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरनं 31/2025 अन्वये बीएनएस कलम 316(2), 318(3) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी उत्कर्ष जैन (अरिहंत सेल्स नेटवर्क, कन्सल्टंट अॅन्ड मार्केटिंग, आर्यन अॅन्ड स्टील, नेहरू नगर स्क्वेअर, भिलाई, राज्य-छत्तीसगड) याच्यावर फसवणुकीचा आरोप आहे.
दि. 09 मार्च 2025 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता बुट्टीबोरी, नागपूर येथे हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या कंपनीसाठी जी.आय. वायर, स्टे वायर व बारबेड वायर असा एकूण 29.98 टन माल ट्रक (क्र. MH 26 BE 3811) मधून सांगलीकडे रवाना करण्यात आला होता. मात्र, पूर्ण पैसे अदा करूनही आरोपीने नागपूर येथून ट्रक भिलाईकडे वळवून माल न देता परस्पर नेल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5.57 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणताही माल हस्तगत झालेला नाही.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात (मो. क्र. 7030388369) हे सपोनि घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

No comments: