राधानगरीत महाशिवरात्र उत्साहात साजरी.
राधानगरीत महाशिवरात्र उत्साहात साजरी.
-----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
राधानगरी येथील लिंगोबा देवालय येथे महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
आज पहाटे ग्रामस्थांच्या वतीने महादेवाच्या पिंडीस अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर आरोग्य, शांती, दीर्घायुष्य व स्थैर्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लिंगोबा देवालय उपसमिती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाशिवरात्रीनिमित्त राधानगरी परिसरातील भाविक व महिलांनी मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेतला. याबाबतची माहिती देवालयाचे पुजारी संजय गुरव व मधुकर गुरव यांनी दिली.
संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डान्स ग्रुप इचलकरंजी यांच्या कार्यक्रमाने उत्सवात रंगत आणली.

No comments: