Header Ads

कळे येथे होत आहे आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय ब्रह्माकुमारीज चा 90 वा वर्धापन दिन साजरा.

 कळे येथे होत आहे आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय ब्रह्माकुमारीज चा 90 वा वर्धापन दिन साजरा.

-----------------------------------

कळे प्रतिनिधी

सुनिल मोळे

------------------------------------

कळे:- ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण भारतभर 90,000 कार्यक्रम केले जात आहेत. ब्रह्माकुमारीज कळे शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 12 फेब्रुवारी रोजी हरिनारायण सांस्कृतिक हॉल कळे येथे किसान मेळावा आयोजित केला होता. दिनांक 14 व 15 फेब्रुवारी रोजी रामेश्वरम दर्शन, सचित्र देखावा, ध्वजारोहण विविध सचित्र प्रदर्शनी,दिव्य अनुभूती कक्ष,प्रोजेक्टर शो दाखवले जाणार आहेत.तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारीच्या वतीने बाजीराव पाटील आसगाव यांनी केले. 

सेंद्रिय व शाश्वत योगीक शेतीचे मार्गदर्शन प्रमुख व्याख्याते श्री. बाळासाहेब रुग्गे, श्री भोलानाथ चौगुले व ब्रह्माकुमारी संगीता बांबवडे शाखा यांनी केले.कृषी आणि ग्रामविकास प्रभागाच्या राष्ट्रीय संयोजिका सुनंदा दीदी यांनी अध्यक्षीय मनोगत व तालुका कृषी अधिकारी सौ घोलप मॅडम यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व विशद केले .90 व्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त 90 दीप प्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कळे पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक कदम,मंडल कृषी अधिकारी, पदाधिकारी व सहाय्यक श्री. पी. एन. खोत, वैभव नाळे, उदय पाटील, सुनिता कुंभार,गौरी लबडे,मधू कुंभार, शरद पवार मुनीर हवालदार,आशिष पाटील भाग्यश्री तिळवे,राम नाईक उपस्थित होते . सदर कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्राप्त राजयोगिनी सुनंदा बहेनजी यांचा सत्कार नवनियुक्त जि.प. सदस्य सौ. शोभा बेलेकर यांनी केला. सदर किसान मेळाव्यास कळे परिसरातील 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

No comments:

Powered by Blogger.