सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आंबा वन परिक्षेत्रात 100 विद्यार्थ्यांचे पर्यावरण व वन्यजीव संरक्षण शिबिर संपन्न..
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आंबा वन परिक्षेत्रात 100 विद्यार्थ्यांचे पर्यावरण व वन्यजीव संरक्षण शिबिर संपन्न..
मलकापूर:सामाजिक वनीकरण विभाग, कोल्हापूर यांच्या पर्यावरण प्रशिक्षण उपक्रम (EEP) अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आंबा वनपरिक्षेत्र येते दि. ८ जानेवारी रोजी एकदिवसीय निसर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्राइवेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर येथील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण व जैवविविधतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना आंबा येथील निसर्ग माहिती केंद्र , आंबेश्वर देवराई व कोकण दर्शन पॉइंट , मानोली धरण, पावनखिंड या ठिकाणी नेण्यात आले. या ठिकाणी जंगल परिसंस्था, विविध वृक्षप्रजाती, पक्षीनिरीक्षण, वन्यजीवांचे महत्त्व व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरास पंकज कुमार गर्ग (उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे), किशोरकुमार येळे (विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण, कोल्हापूर), सोनम ढोले (सहाय्यक वनसंरक्षक), (विभागीय वनाधिकारी वन्यजीव विभाग चांदोली ), अनिल मोहिते (वनक्षेत्रपाल सा.व.करवीर), गायत्री वसावे (वनक्षेत्रपाल सा.व.मलकापूर ), प्रदीप कोकीतकर (वनक्षेत्रपाल व.जी आंबा ) दिग्विजय पाटील वनरक्षक सामाजिक वनीकरण मलकापूर यांच्यासह सामाजिक वनीकरण व वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निसर्गाशी थेट संपर्क साधल्यामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये अधिक जागरूकता निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. भविष्यात असे निसर्ग शिबिर व पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सामाजिक वनीकरण विभागाकडून सांगण्यात आले.

No comments: