Header Ads

कुडाळ गणाचा चेहरा-मोहरा बदलणार: राजेंद्र शिंदे माय-बाप जनतेने एकदा संधी द्यावी

------------------------

प्रतिनिधी /शेखर जाधव.

-----------------------



 भणंग : - जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अवघ्या एक दिवसावर आल्याने सर्वच पक्षासह अपक्षांच्या नेते मंडळींची धावपळ होताना दिसत आहे.प्रचाराला एक दिवस उरल्याने सर्वत्र सभेचा धडाका  सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार राजेंद्र शिंदें यांच्या गाव भेट दौऱ्यांना थोरा-मोठ्यांसह,माता-भगिनी, युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.मायबाप जनतेने आपले  अनमोल मतदान करून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.अपल्या हक्कांच्या उमेदवारांना संधी द्यावी.निश्चितच आपल्या कुडाळ गणातील विकास कामे वेगाने सुरू करून कुडाळ गणाचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र शिंदे यांनी प्रसिद्धीकाद्वारे व्यक्त केला आहे.

       कुडाळ गणातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र (काका)शिंदे यांनी होम टू होम प्रचाराला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र (काका)शिंदे यांना गणातून वाढता पाठिंबा भेटत आहे.गेल्या ४५ वर्षापासून राजेंद्र शिंदे हे तालुक्यातील राजकारण व समाजकारणामध्ये सक्रिय आहेत. कुडाळ गावातील युवकांना चांगले शिक्षण मिळावे तसेच आरोग्य मिळावे त्याच पद्धतीने गावात हक्काचा पशुवैद्यकीय दवाखाना असावा यासाठी राजेंद्र शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी आपली पाच एकर जागा गावाच्या विकासाकरता दिली आहे. महाराजा शिवाजी हायस्कूल कुडाळच्या इमारत उभारणी करता मोलाचे योगदान दिले आहे.

             जावली तालुक्याच्या मुख्यालयी मेढा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला राजेंद्र शिंदे यांनी वेळोवेळी मदत केली आहे.कायमच आधुनिक शेतीचा प्रयोग करण्याचे मार्गदर्शन ते शेतकऱ्याला देत असतात.आजपर्यंत सामोपचाराने राजेंद्र शिंदे यांनी अनेक कुटुंबातील जमिनीबाबत होणारे वाद सोडवले आहेत.कुडाळ गावातील विकास सेवा सोसायटीतील सभासदांना सर्वोच्च लाभांश मिळवून देण्यामागे राजेंद्र शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. गावपातळीवर धार्मिक कार्यामध्ये पुढाकार घेत विविध कामांसाठी त्यांचे भरीव योगदान आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखाना उभारणीमध्ये आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात त्यांनी वेळोवेळी मदत केली असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

           राजेंद्र शिंदे यांचा जनसंपर्क पाहता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पारडे जड असल्याचे जनतेमधून बोलले जात आहे.तसेच आजपर्यंत राजेंद्र शिंदे यांनी सहकार क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली असून निश्चितच थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि युवा वर्गाच्या साथीने मी ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेंद्र (काका)शिंदे यांनी व्यक्त केला आहे.सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. 



चौकट :


जावळी तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणारे राजेंद्र (काका)शिंदे यांच्या पाठीशी जनता ठाम आहे.तसेच आजपर्यंत दस्त खात्याचे काम सांभाळत असताना त्यांचा नागरिकांशी जनसंपर्क वाढला होता. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये होताना दिसून येत आहे.त्याचप्रमाणे गोरगरीब जनतेच्या पाठीशी ठाम उभे राहून प्रत्येकाला मदत करण्याची भावना त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितच यश मिळवून देईल.



No comments:

Powered by Blogger.