Header Ads

करवीर पोलिसांची कारवाईअवैध विदेशी दारू वाहतुकीप्रकरणी ९.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त.टाटा इन्ट्रा टेम्पोसह एकास अटक.

 करवीर पोलिसांची कारवाईअवैध विदेशी दारू वाहतुकीप्रकरणी ९.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त.टाटा इन्ट्रा टेम्पोसह एकास अटक.

-----------------------------------------

करवीर प्रतिनिधी

-----------------------------------------

करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत ९ लाख ३९ हजार ३८० रुपये किमतीची विदेशी दारू व टाटा इन्ट्रा टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर–गगनबावडा रोडवर अमृत मल्टीपर्पज हॉलसमोर, बालिंगा (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक – २०२६ च्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलिंग सुरू असताना पोहेकॉ सुभाष अर्जुन सरवडेकर (ब.नं. १८७२) यांना गोपनीय बातमीदारामार्फत अवैध दारू वाहतुकीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून MH-09-HB-4356 क्रमांकाच्या टाटा इन्ट्रा टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची विदेशी दारू आढळून आली.

वाहन चालकाकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने सदर दारू कळे व करंजफेन परिसरात विक्रीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

आरोपी

शुभम महादेव कांबळे (वय २८)

रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर

या प्रकरणी करवीर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. ६२/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे करीत आहेत.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर शिंदे व गुन्हे शोध पथकाच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.