छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभाविपतर्फे भव्य रक्तदान शिबिर; ४८ जणांचा सहभाग.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभाविपतर्फे भव्य रक्तदान शिबिर; ४८ जणांचा सहभाग.
रोहित पास्ते गारगोटी :
दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गारगोटी शाखेच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदान केले.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भुदरगड-आजरा तालुका प्रांत अधिकारी हरेश सुळ, ICRE महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम सर, हणबरवाडी गावचे माजी उपसरपंच विजय खोत, सेवा भरती जिल्हा उपाध्यक्ष सौ. रेणू सातोस्कर, अभाविप कोल्हापूर ग्रामीण जिल्हा संयोजक सौरभ खोत, भुदरगड तालुका संयोजक रोहन देसाई, सह-संयोजक अवधूत इंदुलकर तसेच गारगोटी शहर सहमंत्री आर्य जोशी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण ४८ विद्यार्थी व समाजातील नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली. समाजोपयोगी उपक्रमातून युवकांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, गारगोटी शाखेच्या या उपक्रमामुळे जयंती उत्सवाला सामाजिक सेवेची जोड मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात आली.

No comments: