Header Ads

लव्ह जिहाद व जबरदस्ती धर्मांतर विरोधात कायदा करण्याची मागणी — सकल हिंदू समाजाचे निवेदन.

 लव्ह जिहाद व जबरदस्ती धर्मांतर विरोधात कायदा करण्याची मागणी ~ सकल हिंदू समाजाचे निवेदन.

शाहूवाडी रोहित पास्ते: सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद, फसवणूक अथवा जबरदस्तीने करण्यात येणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर कायदा करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालय शाहूवाडी येथे निवेदन सादर करण्यात आले. दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी हे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.


निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी संबंधित विषयावर अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप ठोस कायदेशीर कार्यवाही झालेली नाही. राज्यातील विविध भागांत फसवणूक, मानसिक दबाव व जबरदस्ती धर्मांतराच्या तक्रारी समोर येत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी स्वतंत्र आणि कडक कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात व उत्तराखंड या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही प्रभावी कायदा लागू करावा, विशेष समितीचा अहवाल तातडीने सादर करून आगामी अधिवेशनात कायदा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.


यावेळी महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदनास पाठिंबा दर्शविला.

No comments:

Powered by Blogger.