Header Ads

कळे–पुशिरे परिसरात रान डुकराच्या हल्ला. दोन शेतकरी जखमी.

 कळे–पुशिरे परिसरात रान डुकराच्या हल्ला. दोन शेतकरी जखमी.

~~~~~~~~~~~~~~~

कळे प्रतिनिधी

सुनिल मोळे

~~~~~~~~~~~~~~~~

कळे : कळे व परिसरात रानडुकरांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच घडलेल्या तीन स्वतंत्र घटनांमध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून एका महिलेचा थोडक्यात बचाव झाला आहे. शेतीत कामासाठी गेलेले बळवंत बापू भोसले (वय ७०, रा. जोशी गल्ली, कळे) तसेच मधुकर बापू पाटील (रा. पुशिरे, ता. पन्हाळा) हे शेतकरी रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. दोघांवरही सध्या सीपीआर रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, शारदा शिवाजी लायकर (रा. कळे) यांच्यावरही रानडुकराने हल्ला केला; मात्र वेळीच धावून आलेल्या कुत्र्यांमुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कळे व आसपासच्या गावांमध्ये रानडुकरांचा वावर वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत.

No comments:

Powered by Blogger.