Header Ads

कुपवाडला पाच एसी शौचालय मंजूर करण्यात आले

कुपवाडला पाच एसी शौचालय मंजूर करण्यात आले.

 दलित महासंघ उत्तम दादा (मोहिते गट) मिरज तालुका युवक अध्यक्ष राजू कदम यांनी अर्ध नग्न आंदोलनाच्या इशाऱ्याने 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिनिधी:- शशिकांत कुंभार

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भारत देश हा महासत्ताकडे वाटचाल करीत असता, प्रामुख्याने महाराष्ट्र मध्ये सांगली शहरात अनेक वेळा स्वच्छ भारत अभियान सां.मि.कु. मनपा यांनी राबविले आहे. पंरतु कुपवाड एम.आय.डी.सी. परिसर हगणदारी मुक्त झालेले नाही. गेल्या २ ते ३ वर्षात लोकसंख्या वाढल्यामुळे शाळा, महाविद्यालय व एम.आय.डी.सी कडे कामास जाणारा कामगार वर्ग अशी अनेक लोकांची वर्दळ सदर ठिकाणी असते. सदर कुपवाड शहरामधील आठवडी बाजार हा कायम भरत असतो. आजुबाजुच्या खेड्यातुन बाजारासाठी लोकांची गर्दी खुप प्रमाणात असते. पंरतु सां.मि.कु. मनपा यांनी अद्याप सार्वजनिक सुलभ शौचालय कोणत्याही प्रकारे उपलब्ध केलेले नाहीत. सध्या सां.मि.कु. मनपा यांचे आयुक्त हे अतिक्रमण काढणेच्या मोहीमेत सक्रिय आहेत. पंरतु नागरीकांच्या मुलभुत गरजा या पुरविणेस असक्षम ठरले आहेत. तरी, कुपवाड परिसरातील बाजार पेठ, शाळा, महाविद्यालय व चौक या ठिकाणी मुलभुत गरजा म्हणुन आपल्याकडुन सावर्जनिक सुलभ शौचालय चालु करावेत. या मागणीसाठी सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांना आंदोलनाचे पत्र दिल्या असता आयुक्त म्हणाले की आपण तुमच्या पत्राचे दखल घेऊन व मूलभूत गरजा पाहता कुपवाडला पाच एसी शौचालय मंजूर करण्यात आले आहेत व येत्या पुढील आठवड्यात आपण सार्वजनिक शौचालयाचा टेंडर पास करत आहोत व कुपवाडला दोन महिन्यात स्वच्छ व सुंदर एसी शौचालय बसवण्यात येणार आहेत. असे सहाय्यक आयुक्त सचिन सांगावकर यांनी सांगितले व दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

   राज्यअध्यक्ष मा. वनिताताई कांबळे, महाराष्ट्र निरिक्षक मा. विजयभाऊ घाडगे, तालुका युवक अध्यक्ष मा. राजन कदम, चित्रपट राजअध्यक्ष मा. महावीर चंदनशिवे, पश्चिम महाराष्ट्र कार्याअध्यक्ष मा. दत्ताभाऊ जगदने, महिला प.म.उपाध्यक्षा मा. अनुराधा जगदने, मा. रमेश आण्णा चौगुले, तालुकाध्यक्ष मा. सचिनभाऊ मोरे, मा. शरद शिंदे, मा. अनिल गायकवाड, मा. यश कांबळे, मा. योसेफ मोहिते, मा. साहिल गायकवाड, मा. अर्जुन मोहिते, मा. सतिश वारे, मा.विकास वारे, मा. रोहित वारे, मा. वैभव कोले, मा. रोहित माटे, मा. अक्षय चौगुले, मा. धिरज कांबळे, मा. मधु शेडबाळकर, मा. रोहित कोकरे, मा. सागर म्हारगुडे, मा. तुषार चिंचकर,

No comments:

Powered by Blogger.