दोन वर्षानंतर संभाजीनगर बस स्थानकाचे उद्घाटन 17 एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांच्या हस्ते होणार संभाजीनगर आगार प्रमुख दयानंद पाटील
दोन वर्षानंतर संभाजीनगर बस स्थानकाचे उद्घाटन 17 एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांच्या हस्ते होणार
संभाजीनगर आगार प्रमुख दयानंद पाटील.
----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
----------------------------------
शासनाने गेले दोन वर्षांपूर्वी संभाजीनगर बस स्थानक बस स्थानक अद्यावत करण्यात आले असून त्याचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व पालकमंत्री प्रकाश आबिटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती संभाजीनगर एसटी आगार प्रमुख दयानंद पाटील यांनी दिली
शासनाने गेल्या दोन वर्षांपूर्वी संभाजीनगर बस स्थानक अद्यावत करण्यात आले असून हे बस स्थानक उद्घाटनच्या प्रतीक्षा होते या बस स्थानकाचे उद्घाटनचा मुहूर्त 17 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पालकमंत्री प्रकाश आबिटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सह पालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने जिप अध्यक्ष शीला खोत कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रूपा राणी निकम आमदार सतेज पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार चंद्रदीप नरके आमदार राहुल आवाडे आमदार शिवाजी पाटील आमदार विनय कोरे सावकार आमदार अशोकराव माने आमदार अमल महाडिक एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर जिल्हाधिकारी विजय राठोड कोल्हापूरच्या आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रक समिती क्रमांक चार पुणे चे श्रीमती अमृता ताम्हणकर महाव्यवस्थापक बांधकाम राप मुंबईचे दिनेश महाजन पोलीस अधीक्षक कोल्हापूर चे योगेश गुप्ता इत्यादी अधिकारी वर्ग उपस्थित राहणार असल्याचे शेवटी संभाजीनगर एसटी आगार व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी सांगितले
संभाजीनगर बस स्थानकाचे उद्घाटन होणार असल्याने त्यासाठी बस स्थानकाची स्वच्छता ठेवण्यात आले असल्याची माहिती दयानंद पाटील यांनी सांगितले

No comments: