नांगनूर येथे सुसज्ज अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन; ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा
नांगनूर येथे सुसज्ज अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन; ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा.
----------------------गडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून ही इमारत उभारण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील शिक्षणाचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने अंगणवाड्यांना भक्कम सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी खासदार महाडिक यांनी सांगितले. अंगणवाडी हीच मुलांच्या शैक्षणिक प्रवासाची पहिली पायरी असून, दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उज्ज्वल संधी मिळतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नांगनूर येथील अंगणवाडी क्र. २५८ साठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून आधुनिक व सर्व सोयींनी युक्त अशी इमारत उभारण्यात आली आहे. नव्या इमारतीमुळे परिसरातील बालकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाला सातापा तेरदाळे, चंद्रशेखर पाटील, राजन दड्डीकर, सरपंच सुप्रिया कांबळे, बाळासाहेब मोकाशी, नामदेव मोकाशी, अरुण मोकाशी, गिरीश पाटील, प्रमोद आळवेकर, विकास मोकाशी, बाळ पोटे, राजशेखर पाटील, सचिन घुगरे, सागर गंधवाले यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: