Header Ads

रणसिंग महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात

 रणसिंग महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात .


इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे 

--------------------------------

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षातील शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न झाला.इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश कदम,संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थीचा गौरव करण्यात आला.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी विद्यार्थ्यांनी सातत्य,मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर यश संपादन करावे असे आवाहन केले.उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात आपले कौशल्य विकसित करून समाजात आदर्श निर्माण करावा, असे सांगितले. प्राचार्य डॉ.अशोक काळंगे यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व पटवून दिले.

विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील अनुभव सांगत उपस्थितांना प्रेरित केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्य प्रशांत शिंदे यांनी केले. वार्षिक अहवालाचे वाचन उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. सोनाली चव्हाण,क्रिडा संचालक सुहास भैरट,प्रा. विद्या गुळीग यांनी केले. प्रा. रामचंद्र पाखरे यांनी आभार व्यक्त केले.यावेळी प्रा. विलास बुवा, प्रा.विजय केसकर,प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा. ज्योत्स्ना गायकवाड ,ग्रंथपाल विनायक शिंदे इ मान्यवर व प्राध्यापक,प्राध्यापककेत्तर कर्मचारी,पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.