Header Ads

इचलकरंजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 इचलकरंजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

---------------------------

इचलकरंजी प्रतिनिधी.

लखन जाधव.

-----------------------

इचलकरंजी (प्रतिनिधी) : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथील नवीन महानगरपालिका परिसरात आयोजित कार्यक्रम उत्साहात व अभिमानाने पार पडला.

या प्रसंगी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यानंतर उपस्थित नागरिकांना अल्पोपहार वाटप करण्यात आले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान डॉ. आंबेडकर यांच्या महान विचारांचा जागर करत सामाजिक समता, न्याय व बंधुतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या कार्यक्रमास महापौर, उपमहापौर, आयुक्त, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.