जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा; सेवा-सुविधा सक्षम ठेवण्याच्या सूचना.
जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा; सेवा-सुविधा सक्षम ठेवण्याच्या सूचना.
--------------------------
इचलकरंजी प्रतिनिधी.
लखन जाधव.
--------------------------
जयसिंगपूर (प्रतिनिधी) : जयसिंगपूर परिसरातील गावांसाठी महत्त्वाचे असलेल्या जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे-यड्रावकर यांनी भेट देऊन तेथील सेवा, सुविधा व कामकाजाचा सखोल आढावा घेतला.
या भेटीदरम्यान त्यांनी औषधांचा साठा, तपासणी यंत्रणा, स्वच्छता व्यवस्था तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींची प्रत्यक्ष पाहणी केली. डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत केंद्रातील अडचणी जाणून घेतल्या व त्यावर आवश्यक त्या सूचना दिल्या.
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी अडचण येऊ नये यासाठी सर्व सुविधा सक्षम व सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. औषधांचा पुरेसा साठा, स्वच्छता व सुयोग्य व्यवस्थापन यावर विशेष भर देत गर्भवती माता, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचेही मार्गदर्शन केले.
तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्पर सेवा देण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, रुग्णांशी संवेदनशीलतेने वागावे आणि “सेवा हीच खरी भावना” या तत्त्वावर काम करावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला उत्तम, सुलभ व विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

No comments: