Header Ads

३ अट्टल बाइक चोरटे जेरबंद; १२ मोटारसायकली जप्त

 ३ अट्टल बाइक चोरटे जेरबंद; १२ मोटारसायकली जप्त.

------------------------

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

शशिकांत कुंभार.

-----------------------

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोटारसायकल चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत तीन अट्टल चोरट्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५.२० लाख रुपये किमतीच्या १२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दर्शन रमेश जाधव (वय २६, रा. फुलेवाडी रिंगरोड), फारूक फिरोज शेख (वय १९, रा. बालिंगा) आणि प्रतिक विलास पाटील (रा. फुलेवाडी रिंगरोड) अशी आहेत.

फुलेवाडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोघांना प्रथम ताब्यात घेतले. चौकशीतून उर्वरित चोरी उघडकीस येत तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.