विभागीय शिक्षक मेळाव्यात कुरळ पूर्णा विघालयातील शिक्षिका पूजा पवार यांचा सन्मान
विभागीय शिक्षक मेळाव्यात कुरळ पूर्णा विघालयातील शिक्षिका पूजा पवार यांचा सन्मान.
-------------------------
मयुर खापरे : कुरळपूर्णा
--------------------------
विद्यालयात कार्यरत शिक्षिका पूजा पवार यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत एका कार्यक्रमात भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात आपल्या कल्पक प्रयोगांनी जि. प. शाळांना जागतिक स्तरावर नेऊन ठेवणारे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या उपस्थितीत अमरावती येथे विभागीय शिक्षक मेळावा व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. शिक्षण संघर्ष संघटना आणि भाजपा शिक्षक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेकर बावनकुळे अध्यक्षस्थानी होते. वारे गुरुजींनी याप्रसंगी शिक्षकांना मार्गदर्शन करताना, लोकसहभागातून आणि नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतीतून
--------------------------------
सरकारी शाळांचा कायापालट
कसा करता येतो, याचे उदाहरण दिले.
याप्रसंगी कु. पूजा पवार यांच्यासह अमरावती विभागातील गुणवंत शिक्षकांना वारे गुरुजींच्या हस्ते 'शिक्षक गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. संगीता शिंदे (बोंडे) यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. हा सन्मान मिळाल्याबददल श्री शिवगिर बाबा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. संजीवनी कावरे, सचिव एस. के. कावरे आणि कुरळपूर्णा विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भटकर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूजा पवार यांचे अभिनंदन केले.

No comments: