Header Ads

नवे आयुक्त! डॉ. राजेंद्र भारुड यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारताच विकासाचा ध्यास अंबाबाईचे दर्शन घेऊन कार्यारंभ; “कोल्हापूरला प्रगतीपथावर नेणार” – नूतन आयुक्तांची ग्वाही.

 नवे आयुक्त! डॉ. राजेंद्र भारुड यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारताच विकासाचा ध्यास

अंबाबाईचे दर्शन घेऊन कार्यारंभ; “कोल्हापूरला प्रगतीपथावर नेणार” – नूतन आयुक्तांची ग्वाही.

-----------------------------------

शशिकांत कुंभार .

-----------------------------------

कोल्हापूर  :

कोल्हापूर महानगरपालिकेला (KMC) अखेर नवे आयुक्त मिळाले असून, डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज सायंकाळी चार वाजता आयुक्तपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. माजी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून त्यांनी कार्यभार घेतला. पदभार स्वीकारताच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झालेल्या के. मंजूलक्ष्मी यांच्या जागी डॉ. भारुड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते.

कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर डॉ. भारुड यांनी प्रथम अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले, त्यानंतर महापालिकेत येऊन पदभार स्वीकारला. महापौर रूपाराणी निकम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

पदभार स्विकारल्यानंतर डॉ. भारुड यांनी महापौर निकम यांची भेट घेऊन महापालिकेच्या विविध प्रलंबित व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. त्यानंतर आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 विशेष ठळक :

“कोल्हापूर शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू” – डॉ. राजेंद्र भारुड

अंबाबाईच्या दर्शनाने कार्यारंभ; प्रशासनात वेग आणण्याचे संकेत विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेऊन कामकाजाचा घेतला आढावा

No comments:

Powered by Blogger.