आंबेडकर व शिवजयंती पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांची शांतता समन्वय बैठक मिरवणुका, ध्वनी मर्यादा व सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शन.
आंबेडकर व शिवजयंती पार्श्वभूमीवर करवीर पोलिसांची शांतता समन्वय बैठक
मिरवणुका, ध्वनी मर्यादा व सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शन.
-----------------------------
प्रतिनिधी : संस्कार कुंभार .
------------------------------
दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.४५ या वेळेत करवीर पोलीस ठाणे हद्दीतील आंबेवाडी येथील गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) व छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ एप्रिल) पार्श्वभूमीवर शांतता समन्वय बैठक घेण्यात आली.
या बैठकीस विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, शांतता कमिटी सदस्य, विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पारंपरिक वाद्यांचा वापर, ध्वनी प्रदूषण व आवाजाची मर्यादा, मिरवणुकीचे मार्ग व कालावधी, रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता, आक्षेपार्ह पोस्टर-बॅनर टाळणे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, सायलेन्सर काढून मोटारसायकल चालविणे, हुल्लडबाजी, मद्यपान व अमली पदार्थ सेवन यांसारख्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
तसेच पुतळे, फोटो व डिजिटल बॅनरचे संरक्षण, २४ तास स्वयंसेवकांची नियुक्ती, पुरेशी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्हीचा वापर, तसेच जयंतीदरम्यान घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यावर भर देण्यात आला. सामाजिक एकोपा जपत राष्ट्रपुरुषांच्या जयंती शांततेत व विधायक उपक्रमांद्वारे साजरी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
उपस्थितांनीही आपली मनोगते व्यक्त करून जयंती उत्सव शांततेत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस परिविक्षाधीन भा.पो.से. अधिकारी अरांक्षा यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव करे, सहायक फौजदार विजय गुरव, अविनाश पोवार आदी उपस्थित होते.

No comments: