Header Ads

मुरगुडमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 मुरगुडमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  मोठ्या उत्साहात साजरी

---------------------------

मुरगूड/ जोतीराम कुंभार.

---------------------------

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मुरगुड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील शिवतीर्थ, हुतात्मा तुकाराम वाचनालय, मुरगुड नगरपालिका, मुरगुड पोलीस स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडले.

जयंतीनिमित्त मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मुरगुड पोलीस स्टेशन येथे नूतन एपीआय क्रांती पाटील व पीएसआय अनिकेत कुंडले यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मुरगुड नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले, सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून महामानवांना अभिवादन करण्यात आले.

शहरातील शिवतीर्थ येथे उद्योगपती ज्योतीराम सूर्यवंशी आणि दलितमित्र डीडी चौगुले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर भीम प्रार्थना सादर करण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

यावेळी ओंकार पोतदार आणि दलितमित्र डीडी चौगुले यांनी मनोगत व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करण्याचे आवाहन केले.मुरगूड नगरपालिकेकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीची मागणी नागरिकांनि केली यावेळी सदाशिव मंडलिक कारखान्याचे संचालक अनिल सिद्धेश्वर,सुहास खराडे सत्यजित पाटील, एस व्ही चौगुले सर,जयसिंग भोसले, ज्योतिराम सूर्यवंशी, जिवन साळोखे, महादेव काणकेकर,किरण गावणकर,दत्ता मंडलिक, सुनील मंडलिक, सिकंदर जमादार,एम टी सामंत, अरुण मेंडके,मयूर आंगज,प्रशांत सिद्धेश्वर,संकेत भोसले, अमित कांबळे, संग्राम बुरुड,दिग्विजय मेटकर,विशाल कांबळे, तुषार कांबळे,पद्मेसन कांबळे, प्रेम कांबळे, पृथ्वीराज आसवले, राजेंद्र कांबळे

No comments:

Powered by Blogger.