ग्रामीण तरुणाई मध्ये जिद्द चिकाटी आणि कष्टाची तयारी असल्यामुळे पोलीस भरतीमध्ये ग्रामीण तरुणांना चांगली संधी सहकार भूषण ए डी पाटील
ग्रामीण तरुणाई मध्ये जिद्द चिकाटी आणि कष्टाची तयारी असल्यामुळे पोलीस भरतीमध्ये ग्रामीण तरुणांना चांगली संधी
सहकार भूषण ए डी पाटील.
----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.
-----------------------------------
ग्रामीण तरुणाई मध्ये जिद्द चिकाटी आणि कष्टाची तयारी असल्यामुळे पोलीस भरतीमध्ये ग्रामीण तरुणांना चांगली संधी मिळत आहे. त्यामुळे तरुणांनी, शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य द्यावे असे आवाहन गुडाळेश्वर पतसंस्थेचे संस्थापक सहकार भूषण ए डी पाटील यांनी काढले.
गुडाळेश्वर पतसंस्थेच्या वतीने पोलीस दलात निवड झालेल्या तरुण-तरुणींच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुडाळेश्वर विकास संस्थेचे माजी चेअरमन वाय. जी. गुडाळे- पाटील हे होते.
उपस्थितांचे स्वागत पतसंस्थेचे वसुली अधिकारी पंडित पाटील यांनी केले.
गुडाळेश्वर पतसंस्थेने तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणवंत, विविध पदावर निवड झालेले तरुण-तरुणी यांचे सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे चांगले कार्य नेहमीच केले आहे असे उद्गार निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ए बी माळवी यांनी काढले.
याप्रसंगी पोलीस दलात निवड झालेल्या अविनाश माळवी, शर्विल पाटील, कु.अंकिता दिलीप पाटील यांचे सत्कार ए डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे बँक निरीक्षक इंद्रजीत पाटील,कु. अंकिता पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास गुडाळेश्वर विकास संस्थेचे चेअरमन आशिष पाटील,संदीप पाटील, दत्तात्रय म्हाकवेकर, जी के पाटील, तुकाराम जाधव (तात्या)आदी मान्यवरासह संस्थेचे संचालक -सभासद उपस्थित होते. आभार आदिनाथ आवळकर यांनी मानले.

No comments: