राज्यघटनेचा जयजयकार आणि शिक्षणाचे खाजगीकरण हा व्यवस्थेचा चलाख डाव” डॉ. आनंद मेनसे
“राज्यघटनेचा जयजयकार आणि शिक्षणाचे खाजगीकरण हा व्यवस्थेचा चलाख डाव”
डॉ. आनंद मेनसे.
-------------------
मुरगूड प्रतिनिधी :
जोतिराम कुंभार.
----------------------
“राज्यघटनेचा जयजयकार आणि शिक्षणाचे खाजगीकरण हा व्यवस्थेचा चलाख डाव भविष्यात भारतामध्ये मनुस्मृतीची विषमतेवर आधारित समाज उभी करण्यास सहाय्यभूत ठरेल." असा इशारा प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी दिला.
समाजवादी प्रबोधिनी, मुरगूड यांच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत "मनूस्मृती दहन व चवदार तळ्याच्या सत्याग्रह" दुसरे पुष्प प्राचार्य डॉ.आनंद मेनसे यांनी गुंफले.
अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके होते.
प्रारंभी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.
प्रमुख वक्ते डॉ.आनंद मेनसे यांनी आपल्या व्याख्यानात सध्याच्या सामाजिक व शैक्षणिक व्यवस्थेवर परखड भाष्य केले. “आजची व्यवस्था अत्यंत चलाख आहे. राज्यघटनेचा जयजयकार करताना शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा पद्धतशीर डाव रचला जात आहे. उघडपणे मनुस्मृतीचे समर्थन करता येत नसल्याने आणि राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वे बदलता येत नसल्याने ही दुहेरी भूमिका घेतली जात आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समीर कटके यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. एस. खामकर यांनी केले.
या प्रसंगी नगरसेवक राजू आमते, सुहास खराडे, शिवाजी चौगले यांच्यासह प्रबोधिनीचे अध्यक्ष कॉ. बबन बारदेस्कर, मार्गदर्शक डी.डी.चौगले, एम. टी. सामंत, शरद कुलकर्णी, कीर्तीकुमार जोशी,निखिल वाली, विजय सापळे, सचिन सुतार,राजेश व्हनबट्टे, बाळासाहेब फर्नांडिस, महादेव वागवेकर,सखाराम सावर्डेकर,विश्वनाथ शिंदे,मनाजी सासने,एम.बी.कांबळे,गणपतराव मांगोरे,सर्जेराव अवघडे आदी उपस्थित होते.
व्याख्यानमालेस नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

No comments: